Posts

नागवंशी महार समाज हा महाराष्ट्रातला स्थिर समाज होता.तो रंगाने काळा, हनुवटीचा भाग उंचावलेला, बसक्या नाकाचा, व कवटी गोल असणारा होता.त्याचा सामना रट्ट ह्या फिरत्या टोळीशी झाला.ही टोळी रंगाने ताम्रवर्णी, हनुवटीची कमी उंचीची,सरळ नाकाची, व कवटी उभी असणारे लोक होते. प्रथम त्यांच्यात संघर्ष झाला पण नंतर संकरण झाले. त्यामुळे महार+रट = महारट्टा उर्फ महाराट उर्फ मराठे असे नमाभिदान झाले. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महारांना थोरल्या घरचे असे संबोधले जाते. उपहासाने म्हटले तरी सत्यच ताणून बोलण्याचा प्रघात आहे. प्रसिध्द विदुषी इरावती कर्वे यांनी देखील महार व मराठे हे दूरदूरच्या नात्याने चुलत चुलत भाऊ असल्याचे त्यांच्या लिखाणात म्हटले आहे